Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बदल्यांच्या मार्गदर्शक सूचना जाहीर आस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक सिंघल यांनी पाठवली पत्रे

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बदल्यांच्या मार्गदर्शक सूचना जाहीर
आस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक सिंघल यांनी पाठवली पत्रे



मुंबई : खरा पंचनामा

यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत दिलेल्या सूचनांनुसार पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबत मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. आस्थापनाचे अपर पोलिस महासंचालक संजीव कुमार सिंघल यांच्या सहीने या सूचनांची पत्रे सर्व पोलिस आयुक्त, विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक, पोलिस अधीक्षकांना बुधवारी पाठवण्यात आली आहेत. 

सर्व संबंधित घटक प्रमुखांनी निवडणूक आयोगाच्या सूचना, निर्देशानुसार कार्यवाही करावी असे सिंघल यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पोलिस उपनिरीक्षक ते निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदली, पदस्थापनेबाबत पोलिस अधीक्षक यांच्या स्तरावरील कार्यवाही दि. ९ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. ज्या अधिकाऱ्यांच्याबद्दल अधीक्षकांच्या स्तरावर कार्यवाही करणे शक्य नसेल त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव विशेष पोलिस महानिरीक्षक, पोलिस उपमहानिरीक्षक यांच्याकडे दि. ९ जानेवारीपर्यंत सादर करावेत असेही पत्रात म्हटले आहे. 

परिक्षेत्रीय स्तरावरील बदली, पदस्थापनेबाबतची कारवाई दि. १२ जानेवारीपर्यंत पूर्ण करावी. त्यांच्या स्तरावर कार्यवाही करणे शक्य नसेल तसेच परिक्षेत्रामध्ये सामावून घेणे शक्य नसेल त्या अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलिस आस्थापना मंडळ क्र. २ यांच्या कार्यालयास पाठवावेत. तसेच ज्या उपविभागीय अधिकारी, अपर पोलिस अधीक्षक, पोलिस अधीक्षक यांची बदली करणे आवश्यक आहे त्या पोलिस अधिकाऱ्यांचे प्रस्ताव पोलिस आस्थापना मंडळ क्र. १ यांच्या कार्यालयास पाठवावेत असेही या पत्रात म्हटले आहे.  

पोलिस आयुक्त स्तरावरील बदली, पदस्थापनेबाबत दि. १२ जानेवारीपयर्त कार्यवाही करावी. तसेच ज्यांच्यावर कार्यवाही करणे शक्य नसेल त्यांचे प्रस्ताव पोलिस आस्थापना मंडळ क्र. १, २ कडे पाठवावेत. पोलिस अधीक्षक यांनी केलेल्या केलेल्या कार्यवाहीचा अहवाल दि. १० जानेवारी, तसेच पोलिस आयुक्त, विशेष महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक यांनी कार्यवाहीचा अहवाल दि. १३ जानेवारीपर्यंत ई-आफिस प्रणाली किंवा खास दूतामार्फत पाठवावेत असेही सिंघल यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.