Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तीस हजारांची लाच घेताना महिला तहसीलदार, महसूल सहायकाला अटक

तीस हजारांची लाच घेताना महिला तहसीलदार, महसूल सहायकाला अटक



जालना : खरा पंचनामा

आजोबा मयत झाल्यानंतर झालेली एकत्र कुटुंबकर्ता नोंद रद्द करून वारसांची नावे सातबारा उतारी नोंद घालण्यासाठी तीस हजारांची लाच घेताना बदनापूर येथील महिला तहसीलदारासह महसूल सहायकाला रंगेहात पकडण्यात आले. बुधवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली. 

तहसीलदार सुमन उद्धवराव मोरे (वय ५०, रा. छत्रपती संभाजीनगर), महसूल सहायक निलेश धर्मराज गायकवाड (वय ३४, रा. जालना)  अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. तक्रारदार व्यक्तीच्या आजोबांचे निधन झाल्यानंतर तक्रारदार यांच्या चुलत्याचे नाव रामखेडा येथील जमीनीच्या सातबारा उताऱ्यावर एकत्रित कुटुंबकर्ता असे नाव नोंद होते. 

चुलत्याचे नाव रदद् करून सर्व वारसांची नावे सातबारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी तक्रारदाराने अर्ज केला होता. ती नावे नोंद करण्यासाठी तहसीलदार मोरे यांनी गायकवाड याच्यामार्फत ३० हजार रूपये लाचेची मागणी केली होती.

मात्र तक्रारदारांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. विभागाने याची पडताळणी केल्यानंतर मोरे यांनी लाच मागून ती गायकवाड याच्याकडे देण्यास सांगितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर बुधवारी दुपारी तक्रारदाराकडून ३० हजारांची लाच त्याने घेतली. आणि मोरे यांना त्यांच्या केबिनमध्ये नेऊन पंचासमोर दिली. त्यानंतर दोघांना अटक करण्यात आली. तहसीलदार मोरे आणि महसूल सहायक गायकवाड यांच्याविरोधात बदनापूर पोलिस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.