Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी

मराठा आंदोलकाने आक्रमक होत पेटवली स्वतःचीच गाडी



नांदेड : खरा पंचनामा

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. आता त्यांनी आंदोलनदेखील पुकारलं आहे. यानुसार राज्यात ठीकठिकाणी रास्ता रोको केला जातो आहे. हे आंदोलन शांततेत करावं असे आदेश मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. मात्र एका मराठा आंदोलकाने त्यांचा आदेश झुगारत आक्रमक होत मराठा आरक्षणासाठी स्वतःची गाडी पेटवली आहे.

नांदेड जिल्ह्यातील लोंढे सांगवी इथं रास्ता रोको करताना एका आंदोलकाने स्वतःची दुचाकी जाळली आहे. शिवहरी लोंढे असं या व्यक्तीचं नाव. त्याने आक्रमक होत स्वतःचीच गाडी पेटवली आहे. आंदोलनादरम्यान त्याने मुख्य रस्त्यावर आपली दुचाकी आणली आणि पेटवून दिली. या पेटलेल्या गाडीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.