Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवार यांची भेट; चर्चेला उधाण...

रोहित पवार, सुप्रिया सुळे यांनी घेतली अजित पवार यांची भेट; चर्चेला उधाण...



पुणे : खरा पंचनामा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोहित पवार, राजेश टोपे आणि सुप्रिया सुळे यांनी आज (शनिवार) भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आले आहे. रोहित पवार हे सर्किट हाऊसला गेले होते. या भेटीत अनेक मुद्द्यांची चर्चा झाल्याची माहिती पुढे आली आहे.

राज्यात शरद पवार आणि अजित पवारांमध्ये कलगीतुरा रंगताना दिसत असून, एकमेकांवर भरसभेत तारेशे ओढताना दिसत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांर्तगत वेगवेगळ्या हालचाली होताना दिसत आहे. या सगळ्यातच शरद पवार गटाचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे आमदार राजेश टोपे यांनी अजित पवार यांची सकाळी भेट घेतली आहे. पुण्यातील शासकीय विश्रामगृहात त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा उलटसुलट चर्चाना सुरुवात झाली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात आज विविध बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी सात वाजल्यापासून पुण्यातील सर्कीट हाऊसमध्ये बैठका सुरु आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाचे सगळेच नेते सोडून जात असताना आज सकाळीच अजित पवार यांची राजेश टोपे यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. महत्वाचे म्हणजे या दोघांची बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत नेमकं काय घडलं? ही भेट नेमकी कशासाठी होती?, राजेश टोपे अजित पवार यांच्या गटात प्रवेश करणार का? यासंदर्भात माध्यमांनी प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांनी या भेटीबाबत बोलायला नकार दिला. यामुळे या भेटीत काय खलबत झाले त्याची माहिती अजून समोर आली नाही. मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळे तर्कवितर्क लढवायला सुरुवात झाली आहे.

सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या भेटीबाबत सांगताना म्हटले की, 'पिण्याचे पाणी, शेतीचे पाणी, गुरांचं पाणी आणि छावण्या याचा विचार गांभीर्याने करावा एवढीच विनंती करायला मी आले होते. अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री आहेत. ते वेगळ्या विचाराच्या सरकारमध्ये काम करत असले तरी लोकांच्या कामासाठी लोकप्रतिनिधी म्हणून भेट घेण्यात काही वावगं नाही.'

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.