Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अमाप संपत्तीचा आरोप; तीन पोलिसांची मूळ ठिकाणी नियुक्ती 'मॅट'चा निकाल

अमाप संपत्तीचा आरोप; तीन पोलिसांची मूळ ठिकाणी नियुक्ती
'मॅट'चा निकाल



इंदापूर : खरा पंचनामा

अमाप पैसा गोळा केल्याच्या तक्रारीवरून इंदापूरच्या तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी मुख्यालयात बदली झाली होती. याविरोधात त्यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाकडे (मॅट) दाद मागितली होती.

तक्रारदारच न सापडल्याने त्यांना पुन्हा मूळ जागी रुजू करण्याचा आदेश मॅटने दिला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, प्रवीण भोईटे, प्रवीण शिंगाडे व मनोज गायकवाड हे इंदापूर ठाण्यात कार्यरत होते. त्यांच्यावर अवैध धंदेवाल्यांशी संबंध आहेत, ते आरोपींना मदत करतात, त्यातून त्यांनी अमाप पैसा गोळा केल्याची तक्रार सखाराम आर. शिंदे (इंदापूर) या नावे 1 डिसेंबर 2022 रोजी करण्यात आली होती. त्याआधारे बारामतीचे उपविभागीय अधिकारी गणेश इंगळे यांनी चौकशी केली. मात्र, तो तक्रारदार मिळून आला नाही. मात्र, तक्रारीच्या आधारे या तीन पोलिस कर्मचाऱ्यांची ग्रामीण मुख्यालयात बदली करण्यात आली.

याविरोधात या कर्मचाऱ्यांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. आठ दिवसांत सर्व पुरावे वापरून तक्रारदार शोधा, तक्रार त्यानेच केली का ? याची खात्री करा, आरोप पडताळून पाहा, असे निर्देश मॅटने दिले. तक्रारीत तथ्य असल्यास तुम्ही केलेली बदलीची कृती योग्य ठरवू, अन्यथा या तीनही कर्मचाऱ्यांना पूर्व पदावर इंदापूर येथे नियुक्त करा, असे आदेश मॅटने जारी केले. निर्धारित कालावधीत पोलिसांना तक्रारदार शोधण्यात अपयश आले. यामुळे वरील निर्णय लागू झाला. केवळ तक्रार आली म्हणून कोणाची बदली करणे योग्य नाही, असे स्पष्ट करत पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांवर अधिकाराचा गैरवापर केल्याचा ठपका ठेवला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.