Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी दीक्षांत संचलन समारंभ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी प्रमुख अतिथी

तुरची पोलिस प्रशिक्षण केंद्रात मंगळवारी दीक्षांत संचलन समारंभ
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी प्रमुख अतिथी



सांगली : खरा पंचनामा

महाराष्ट्र पोलीस प्रशिक्षण संचलनालयाच्या तुरची (ता. तासगाव) येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रात नवप्रविष्ठ पोलिस अंमलदारांच्या दीक्षांत संचलन समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी सकाळी आठ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य धीरज पाटील यांनी दिली. 

प्रशिक्षण केंद्रातील परेड मैदानावर या समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी आठ वाजता प्रमुख अतिथींचे समारंभस्थळी आगमन होईल. त्यानंतर त्यांना मानवंदना दिली जाईल. नंतर ते परेडचे निरीक्षण करतील. त्यानंतर नवप्रविष्ठ अंमलदारांचे शपथ ग्रहण होईल. त्यानंतर त्यांचे संचलन होईल. 

यावेळी प्राचार्य धीरज पाटील यांचे अहवाल वाचन होईल. त्यानंतर प्रमुख अतिथी महानिरीक्षक श्री. फुलारी यांच्याहस्ते पारितोषिक वितरण करण्यात येईल. नंतर श्री. फुलारी उपस्थितांना संबोधित करणार आहेत.  उपप्राचार्य सुजय घाटगे, उदय डुबल कार्यक्रमाचे संयोजन करत आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.