Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

अजयकुमार बन्संल यांनी जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला मावळते अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निरोप

अजयकुमार बन्संल यांनी जालना पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला
मावळते अधीक्षक शैलेश बलकवडे यांना निरोप



संभाजी पुरीगोसावी 
जालना :  खरा पंचनामा

लोकसभा सर्वात्रिक निवडणूकीच्या  अनुषंगाने राज्यातील आइपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये जालनाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांची अप्पर पोलीस आयुक्त (क्राइम) पदी पदोन्नती करण्यात आली आहे. शैलेश बलकवडे यांच्या जागी जालनाचे नवीन आयपीएस अधिकारी म्हणून अजयकुमार बन्संल यांची जालना पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नुकताच बन्सल यांनी जालना अधीक्षक पदाचा कार्यभार शैलेश बलकवडे यांच्याकडून स्वीकारला.

अजयकुमार बन्संल यांनी यापूर्वी पोलीस अधीक्षक सातारा, गडचिरोली पोलीस उपआयुक्त बृहन्मुंबई आदि ठिकाणी काम केले आहे. रविवारी दुपारी त्यांनी जालना पोलीस मुख्यालयात शैलेश बलकवडे यांच्याकडून पदभार स्वीकारला. 

यावेळी जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी आणि जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी मुक्त करणार तसेच जालना जिल्हा हा शांत आणि अतिशय शांतप्रिय जिल्हा म्हणून ओळखला जातो असल्यांचे नूतन पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे. आणि या जिल्ह्यात शासनाने माझी पोलीस अधीक्षक म्हणून माझ्याकडे जबाबदारी दिली आहे. ती मी जबाबदारी पार पाडणार आहे. आणि अशा या शांत आणि शांतप्रिय जिल्ह्यात जिल्ह्यात माझी बदली झाली हे माझे भाग्यच म्हणावे लागेल, सर्वांना सोबत घेवुनच जिल्ह्यामध्ये काम करणार असल्यांचे देखील नूतन पोलीस अधीक्षकांनी सांगितले. मराठा आरक्षण अंतरवाली सराटी लाठीचार्ज प्रकरणापासून जालना जिल्ह्यात पोलीस अधीक्षकांची चांगलीच संगीत खुर्ची दिसून येत होती. आयपीएस अधिकारी तुषार दोशी यांच्यानंतर कोल्हापूर गडचिरोली या जिल्ह्यात उत्कृंष्ट काम केलेले आयपीएस अधिकारी शैलेश बलकवडे यांची राज्य शासनांने तात्काळ जालना पोलीस अधीक्षक पदावर नियुक्ती केली होती. शैलेश बलकवडे यांनी जालना जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, तसेच त्यांनी सर्वांना सोबत घेवुन जिल्ह्यामध्ये काम पाहिले होते. 

मावळते पोलीस अधीक्षकांना जालना जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी निरोप दिला, तर नूतन पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी शैलेश बलकवडे यांनी पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्याकडे जालना जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे सोपवत पुढील सेवेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.