Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

राज्यातील २२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या

राज्यातील २२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्यामुंबई : खरा पंचनामा

राज्यातील पोलिस प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्या आहेत. सोमवारी राज्यातील २२ पोलिस उपअधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाचे अवर सचिव स्वप्नील बोरसे यांच्या सहीने सोमवारी बदल्याचे आदेश काढण्यात आले आहेत. 

बदली झालेल्या अधिकाऱ्याचे नाव कंसात कोठून कोठे बदली : विक्रम साळी (सहायक महानिरीक्षक, मुंबई ते प्राचार्य पीटीसी अकोला), अशोक इंदलकर (सीआयडी पुणे ते पदोन्नतीने सीआयडी), संदीप मिटके (नाशिक शहर ते आर्थिक गुन्हे शाखा, अहमदनगर), संजय बांबळे (आर्थिक गुन्हे शाखा अहमदनगर ते पोलिस अकादमी नाशिक), पुंडलिक भाटकर (नागपूर ग्रामीण ते आर्थिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण), गणेश इंगळे (नांदेड ग्रामीण ते पुणे शहर), रमेश बरकते (चांदूर रेल्वे ते रामटेक), राहुल झाल्टे), पालघर ते गणेशपुरी), अजय कोकाटे (जिमलगट्टा ते भहेरी), वैशाली माने (अमरावती ते सीआयडी पुणे), राजीव नवले (गडहिंग्लज ते नाशिक शहर), रामदास इंगवले (औसा ते गडहिंग्लज), अनिल घेरडीकर (पदस्थापनेच्या प्रतीक्षेत ते ठाणे शहर), गणपत पिंगळे (जात पडताळणी बुलढाणा ते जव्हार), धुळा टेळे (नवी मुंबई ते कर्जत), विजय लगारे (कर्जत ते नांदेड ग्रामीण), अजयकुमार लांडगे (नागपूर ते नवी मुंबई), राधिका फडके (चंद्रपूर ते रत्नागिरी), कैलास जयकर (पीटीसी अकोला ते पोलिस अकादमी नाशिक), बाजीराव महाजन (लोहमार्ग मुंबई ते मनमाड), आशित कांबळे (रामटेक ते चांदूर रेल्वे), गणेश बिरादार (नाशिक ते समादेशक रा. रा. बल, दौंड).

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.