Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

केजरीवालांच्या सचिवांसह १० ठिकाणी 'ईडी'चे छापे

केजरीवालांच्या सचिवांसह १० ठिकाणी 'ईडी'चे छापे



नवी दिल्ली : खरा पंचनामा

दिल्ली जल बोर्डातील भ्रष्टाचार प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) आज (दि. ६) आम आदमी पार्टीच्या बड्या नेत्यांच्या घरांवर छापे टाकले. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे खाजगी सचिव बिभव कुमार यांच्या निवासस्थानासह 10 हून अधिक ठिकाणी 'ईडी'ने तपासणी सुरु केली आहे.

शलभ कुमार हे जल मंडळाचे माजी सदस्य आहेत. त्यांच्या जागेवरही छापे टाकण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, आम आदमी पक्षाचे खासदार एनडी गुप्ता यांच्या घरावर ईडीचा छापा सुरू आहे. दरम्यान, दिल्ली जल बोर्डाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेले डीजेबीचे निवृत्त मुख्य अभियंता जगदीश अरोरा आणि कंत्राटदार अनिल अग्रवाल यांच्या ईडी कोठडीत पुढील पाच दिवसांची वाढ करण्यात आली आहे. दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी झाली. 

जगदीश अरोरा आणि अनिल अग्रवाल यांना दिल्ली जल बोर्डाला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लो मीटरच्या पुरवठ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. पाच दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर ईडीने दोघांच्या कोठडीत वाढ करण्याची मागणी केली होती, ती मान्य करत न्यायालयाने दोघांच्या कोठडीत पाच दिवसांची वाढ केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.