Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'सर्व एकटा देवेंद्र फडणवीस करतोय' मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच थेट आरोप

'सर्व एकटा देवेंद्र फडणवीस करतोय'
मनोज जरांगेंचा पहिल्यांदाच थेट आरोपजालना : खरा पंचनामा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे यांनी आज निर्णायक बैठक बोलावली आहे. या बैठकीत मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन पहिल्यांदाच थेटच आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी सर्व एकटा देवेंद्र फडणवीस प्रयत्न करतोय, असे जरांगे म्हणाले आहेत.

या लोकांना मराठ्यांचा दरारा संपवायचा आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे माणसं असून, अजित दादांचे देखील दोन आमदार आहेत. देवेंद्र फडणवीसचे षडयंत्र आहे. तुला माझा बळी पाहिजे तर मी सागर बंगल्यावर येतो. अजय बारसकर देखील फडणवीस यांनी उभा केला आहे. मीडियावर दबाव टाकण्यात आले. यात काही समनव्यक सुद्धा आहेत. मला बदनाम करण्यासाठी मुंबईत प्रेस घेतील. देवेंद्र फडणवीस म्हटले तर नारायण राणे काही करू शकत नाहीत. त्याच्या डोक्यात मी ब्राम्हण त्या मराठ्यांना हरवून दाखवू असे असल्याचं जरांगे म्हणाले.

मराठा समाजाला आरक्षण मिळू नयेत यासाठी फडणवीस प्रयत्न करत आहेत. फडणवीस यांना माझा बळी हवा असेल तर मी सागर बंगल्यावर जायला तयार आहे. माझ्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी माझ्या विरोधात तक्रारी शोधल्या जात आहे. संपूर्ण राज्यात माझ्या विरोधात छेडछांड, विनयभंगबाबत एकही तक्रार असल्यास जे सांगाल ते करायला तयार आहे. एखाद्या व्यक्तीच्या खाजगी आयुष्यात तुम्ही हात घालू शकत नाही, असे जरांगे म्हणाले आहेत. फडणवीस तू माझा बळी घेणार असेल तर उपोषण करून मरण्यापेक्षा तुझ्या दारात मरतो. तू गनिमा कावा करत असशील तर तुला आयुष्यातून उठवणार असे जरांगे म्हणाले.

दरम्यान याचवेळी बोलतांना मनोज जरांगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील आरोप केले आहेत. "तुमच्या सत्तेसाठी शेतकऱ्यांचे मुद्दडे पडायला निघालात. पटेल, यादव जाट हा क्षत्रिय समाज तुम्हाला संपवायचं आहे. तुम्हाला मोठ्या जाती संपवून तुम्हाला छोट्या जाती मोठ्या करायच्या आहेत. उत्तर प्रदेशमधील बौद्ध समाज संपवला, महाराष्ट्रत मुस्लिम समाज संपवला," असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.