Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! भरतीच्या सरावासाठी जाताना भीषण अपघात; १ जागीच ठार, ३ जखमी

पोलीस होण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं! 
भरतीच्या सरावासाठी जाताना भीषण अपघात; १ जागीच ठार, ३ जखमीसांगली : खरा पंचनामा

सांगलीमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पोलीस भरती सरावासाठी जाणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भरधाव पिकअपने जोरदार धडक दिली. या धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला झाला असून तीन तरुण गंभीर जखमी झाले आहेत.


पोलीस भरतीचा सराव करण्यासाठी दोन मोटरसायकल वरून पहाटेच्या सुमारास दोन दुचाकींवरुन चार तरुण भोसे मधून सांगली क्रीडा संकुल येथे येत होते. रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर कलंबीजवळ आले असता त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या भरधाव पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात एक तरुण जागीच ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.

शिरीष अमसिद्ध खंबाळे (वय 21, रा. भोसे) असे या मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. विश्वजीत विजय मोहिते (वय 24, रा. भोसे) प्रथमेश उत्तम हराळे (वय 24, रा. भोसे), प्रज्वल साळुंखे (वय, 24 रा. कसबे डिग्रज) अशी गंभीर जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भोसे गावातील नातेवाईक व पोलिस भरती सराव करणाऱ्या तरुणांनी घटनास्थळी धाव घेतली.

या अपघातातील दोघा तरुणांना मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून प्रज्वल साळुंखे याला खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गरीब कुटुंबातील हे तरुण पोलीस भरतीसाठी जीवाचे रान करत होते. शिरीष खंबाळे हा जागीच ठार झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.