Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कोल्हापुरात नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापुरात नर्सिंग महाविद्यालय सुरु करणार : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ 



कोल्हापूर : खरा पंचनामा

कोल्हापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय परिचर्या महाविद्यालय (बी. एस.स्सी. नर्सिंग महाविद्यालय) सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यात व देशामध्ये होणारा संसर्गजन्य आजाराचा फैलाव विचारात घेऊन पॅरावैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे शासनाने ठरविले आहे. त्यादृष्टीने अशी नर्सिंग महाविद्यालये सुरु करण्यात येत आहेत. एकूण ७ शासकीय परिचर्या महाविद्यालयांकरिता पहिल्या चार वर्षांसाठी सुमारे २०७ कोटी इतका खर्च करण्यात येईल. तसेच; पाचव्या वर्षापासून प्रतिवर्ष आवर्ती खर्चापोटी सुमारे १७ कोटी इतका निधी देण्यात येईल.

कोल्हापूरसह इतर चार शासकीय परिचर्या महाविद्यालयांसाठी बांधकाम, फर्निचर, यंत्रसामुग्री, मनुष्यबळ व दैनंदिन आवर्ती खर्च इत्यादीसाठी अंदाजे १४१ कोटी इतका खर्च अपेक्षित आहे. उच्चस्तरीय सचिव समितीच्या मान्यतेने आवश्यक निधी उपलब्ध करून देऊन खर्चात मान्यता दिली जाणार आहे. तसेच; आवश्यक पदे भरण्यात येतील, असेही मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.