Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

कारची रस्त्यावरील दुभाजकाला धडक; कोल्हापूरच्या ३ जणांचा जागीच मृत्यू

कारची रस्त्यावरील दुभाजकाला धडक; कोल्हापूरच्या ३ जणांचा जागीच मृत्यू



सांगली : खरा पंचनामा

सांगलीच्या कवठेमहांकाल तालुक्यातील शिरढोण येथे झालेल्या भीषण अपघातामध्ये ३ जण जागीच ठार झालेत तर एक जण गंभीर जखमी झालाय. रत्नागिरी-नागपूर महामार्गावर असणाऱ्या शिरढोण पूलाजवळ भरधाव वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एक महिलेचा समावेश आहे. 

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेले वाहन सांगोल्याहून कोल्हापूरकडे जात होते. या कार चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याच्याकडेला असणाऱ्या डिव्हायडरवर जाऊन आदळली. या कारमध्ये असणारे तिघेजण हे ठार झालेत तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर मृतांमधील महिलेचे नाव राधा जाधव असून इतर दोन मृत पुरुष आणि जखमी व्यक्ती हे कोल्हापूरचे असल्याचे समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.