Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

नूतन एसपी संदीप घुगे यांनी घेतला सांगलीचा कार्यभार

नूतन एसपी संदीप घुगे यांनी घेतला सांगलीचा कार्यभार



सांगली : खरा पंचनामा

सांगलीच्या नूतन पोलिस अधीक्षकपदी आयपीएस अधिकारी संदीप घुगे यांची बुधवारी नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी दुपारी त्यांनी मावळते पोलिस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांच्याकडून सांगलीचा कार्यभार घेतला. मावळते अधीक्षक डॉ. तेली यांची पदोन्नतीवर पुण्यात सीआयडीकडे बदली करण्यात आली आहे. 

अधीक्षक घुगे यांनी यांत्रिक अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केली असून त्यांनी यापूर्वी रायगड, उस्मानाबाद, मालेगाव, नवी मुंबई, अकोला येथे विविध पदावर काम केले आहे. अकोल्यानंतर त्यांनी सांगलीत अधीक्षक पदाची दुसऱ्यांदा सूत्रे घेतली आहेत. २०१५ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेले घुगे यांना पोलिस दलातील विविध पदांवरील कामांचा अनुभव आहे. त्यांच्या कारकिर्दित सांगलीतील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिल्ह्यातील अवैध व्यवसाय, सावकारी, गुंडगिरी, गुन्हेगारी ते मोडीत काढतील अशी सांगलीकरांना अपेक्षा आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.