Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

महाविकास आघाडीत 'स्वराज्य' पक्ष विलीन करणार? संभाजीराजे यांची भूमिका समोर

महाविकास आघाडीत 'स्वराज्य' पक्ष विलीन करणार? 
संभाजीराजे यांची भूमिका समोरमुंबई : खरा पंचनामा

संभाजीराजे छत्रपती यांना महाविकास आघाडीकडून ऑफर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडी संभाजीराजे यांना लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी देण्यास तयार आहे. पण महाविकास आघाडीने एक अट ठेवली आहे.

संभाजीराजे छत्रपती यांनी महाविकास आघाडीच्या कोणत्याही एका घटक पक्षात प्रवेश केला तर त्यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचं निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमत झाल्याचीदेखील माहिती समोर आली आहे. याबाबतच्या बातम्या समोर आल्यानंतर संभाजीराजे यांनी ट्विटरवर (X) ट्विट करत आपली भूमिका मांडली आहे. यामध्ये त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वी स्वराज्य पक्षाची स्थापना केली आहे. याच पक्षाचा उल्लेख त्यांनी आपल्या ट्विटमध्ये केला आहे.

"स्वराज्य पक्ष असताना इतर कोणत्याही पक्षात प्रवेश करण्याचा प्रश्नच येत नाही. राज्यातील जनतेच्या विश्वासावर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाचे भविष्य हे स्वराज्य असेल. या ध्येयाने माझी आणि स्वराज्य पक्ष संघटनेची वाटचाल सुरूच राहणार आहे", असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आहेत. संभाजीराजे यांच्या या ट्विटमुळे ते आता कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नसून, त्यांनी स्वतः स्थापन केलेल्या स्वराज्य पक्षाच्या माध्यमातूनच ते आगामी लोकसभा निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे स्पष्ट झालं आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.