Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हप्ते वसूल करणाऱ्या वाहतूक पोलिस निरीक्षकासह ३९ जणांची तडकाफडकी बदली

हप्ते वसूल करणाऱ्या वाहतूक पोलिस निरीक्षकासह ३९ जणांची तडकाफडकी बदली



ठाणे : खरा पंचनामा

अवजड वाहने, चालकांकडून हप्ते वसुली करणारे मुंब्रा वाहतूक पोलिसांचे 'रॅकेट' पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी उद्धवस्त केले आहे. रस्त्यावर मोक्याच्या ठिकाणी हे रॅकेट घोळका घालून वाहनचालकांकडून चिरिमिरी पासून ते हजारो रुपयांची वसुली करत होते.

याची खातरजमा होताच या रॅकेटमध्ये सक्रीय असलेले वरिष्ठ पोलिस निरीक्षकापासून ते शिपायांपर्यंत तब्बल ३९ जणांवर कारवाई करत पोलिस आयुक्तांनी त्यांची एका रात्रीत मुख्यालयात बदली करून 'नजर कैद' केले आहे. आतापर्यंत अशा प्रकारची कारवाई पहिल्यांदाच झाल्याने पोलिस दलात खळबळ उडाली आहे.

एकीकडे राजकीय गुन्हेगारी वाढत असताना स्वता पोलिसच हप्तेखोरीत व्यस्त असल्याचा आरोप होत होता. मात्र काही आठवड्यांपूर्वी ठाणे पोलिस आयुक्तालायमध्ये एक काळ गाजवलेल्या अधिकाऱ्यांची 'घर वापसी' झाली आहे. यामध्ये स्वता पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचा समावेश आहे. वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्याचे आव्हान असताना त्याची सुरुवात त्यांनी आपल्या खात्यातील 'प्रवृत्ती' पासूनच केली आहे. याचा पहिला दणका मुंब्रा वाहतूक विभागाला मिळाला आहे.

ठाणे शहरातून उरण येथील जे एन पी टी आणि गुजरात, दिल्ली या भागातून मोठ्या प्रमाणावर ठाणे मार्गे आवजड वाहतूक होत असते. या मार्गावरील ही वाहतूक सुरळीत ठेवणे आणि गुन्हेगारी कारवाया रोखणे हे वाहतूक पोलिसांचे मुख्य काम. पण त्याऐवजी कंटेनर आणि मोठमोठी वाहने अडवून वाहतूक पोलिस हप्ता वसुल करत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या.

शिळफाटा, कल्याण फाटा येथे अशाच प्रकारचे हप्ते वसुली सुरू असल्याचे चित्रीकरण एका जागरूक नागरिकांने करून ते पोलिस आयुक्त डुंबरे यांच्या नजरेस आणून दिले होते. त्याची गंभीर दखल घेऊन आयुक्त डुंबरे यांनी मुंब्रा वाहतूक विभागाचे पोलिस निरीक्षक यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक पोलिस उपनिरीक्षक, हवालदार, पोलिस शिपाई या सर्वांची एका रात्रीत बदली करून त्या सर्वाना मुख्यालयात आणून बसवले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.