Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

सहायक पोलिस आयुक्तांच्या सांगण्यावरून लाखाची लाच घेणाऱ्यास अटक

सहायक पोलिस आयुक्तांच्या सांगण्यावरून लाखाची लाच घेणाऱ्यास अटकपुणे : खरा पंचनामा

पिंपरी चिंचवड मधील देहूरोड विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त मुगुट पाटील यांच्या सांगण्यावरून पाच लाखांची लाच मागत त्यातील एक लाख रुपये लाच स्वीकारल्या प्रकरणी एका खाजगी व्यक्तीला अटक करण्यात आली. पुण्यामधील एका खाजगी रुग्णालयाच्या पार्किंग मध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून ही कारवाई केली.

ओंकार भरत जाधव (वय 32, रा. वाकड) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी 32 वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार केली आहे. एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या विरुद्ध देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त यांच्याकडे कात्रज-कोंढवा बायपास रोड, पुणे येथील जागेसंबंधात फसवणुकीचा तक्रार अर्ज होता. या तक्रारी अर्जाची चौकशी सहायक पोलीस आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्याकडे सुरु होती. त्या तक्रार अर्जामध्ये तक्रारदार यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी व मदत करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली.

सहाय्यक आयुक्त मुकुटलाल पाटील यांच्या सूचनेवरून खाजगी व्यक्ती जाधव यांनी पाच लाख रुपयांची लाच मागितली. याबाबत तक्रारदार यांनी एसीबीकडे तक्रार केली असता एसीबीने 15, 16 आणि 17 फेब्रुवारी रोजी सापळा लावला. लाचेचा पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये लाच स्वीकारताना एसीबीने ओंकार जाधव यास ताब्यात घेतले. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सरू आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.