Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एक कोटींची लाच मागितली, जीएसटी सहायक राज्यकर आयुक्तांसह टीमवर गुन्हा मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

एक कोटींची लाच मागितली, जीएसटी सहायक राज्यकर आयुक्तांसह टीमवर गुन्हा
मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाईमुंबई ः खरा पंचनामा

नवी मुंबईतील वाशी येथील एका व्यापाऱ्याच्या घर, कार्यालयावर थकित जीएसटीप्रकरणी छापा टाकण्यात आला होता. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याला या प्रकरणात मदत करण्यासाठी व्हाॅटसअप मेसेजद्वारे एक कोटी रूपयांची लाच मागितल्याप्रकरणी जीएसटीच्या सहायक राज्यकर आयुक्तांसह त्यांच्या टीमवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहित लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबईचे सहायक पोलिस आयुक्त नितीन दळवी यांनी दिली. जीएसटी अधिकाऱ्यासह त्याच्या संपूर्ण टीमवर लाचप्रकरणी गुन्हा दाखल झाल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

अर्जुन प्रकाश सूर्यवंशी असे गुन्हा दाखल झालेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. जीएसटी बिल घोटाळ्यात आर्थिक तडजोड केल्याप्रकरणी सीबीआयकडून चौकशी सुरू करण्यात आल्याचे केंद्र शासनाने जाहीर केले आहे. जुलै, आॅगस्ट २०२३ मध्ये संशयित सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने वाशीतील एका व्यापाऱ्याच्या घरासह कार्यालयावर छापा टाकला होता. त्यानंतर २१ आॅगस्ट रोजी संबंधित व्यापाऱ्याकडून व्हाॅटसअप मेसेजद्वारे एक कोटी रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर संबंधित व्यापाऱ्याने याबाबत जीएसटीच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती.

तक्रारीनंतर विशेष राज्यकर आयुक्त तथा दक्षता अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करण्याबाबत मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर सूर्यवंशी यांनी त्यांच्यासह त्यांच्या टीममधील लोकांसाठी एक कोटी रूपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे त्यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे जीएसटी विभागात खळबळ उडाली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.