Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

काँग्रेसचा मोठा डाव, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार?

काँग्रेसचा मोठा डाव, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार?



नवी दिल्ली : खरा पंचनामा

आगामी राज्यसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या गोटात मोठी खलबतं पाहायला मिळत आहे.

काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं राज्यसभेवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. सोनिया गांधी यांचं जाणं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसून राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आलं आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं राज्यसभेवर जाणं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीही सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी सोनिया गांधी हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावेळी काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की, सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्या लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग निवडू शकतात.

एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढणं आणि त्यासाठी प्रचार करणं प्रकृती अस्वास्थामुळे सोनिया गांधींना शक्य नसल्याचं बोललं जात आहे. सोनिया गांधींच्या लोकसभा निवडणूक लढवण्यावरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.