काँग्रेसचे बडे नेते आमच्या संपर्कात; फडणवीसांचं सूचक वक्तव्य
मुंबई : खरा पंचनामा
राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र काँग्रेसमधील मातब्बर नेत्यांपैकी एक म्हणून ओळख असलेले ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण हे लवकरच मोठा राजकीय निर्णय घेण्याची शक्यता आहे. विश्वसनीय सुत्रांकडून आलेल्या माहितीनुसार, ते लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत.
याबाबत उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण भाजपात प्रवेश करणार का? असा प्रश्न विचारला असता, फडणवीस म्हणाले, हे मी तुमच्याकडूनच ऐकत आहे. पण लवकरच काँग्रेसचे बडे नेते भाजपात येणार असल्याचा इशारा देत, आगे आगे देखो होता है क्या, असं म्हणत त्यांनी सूचक वक्तव्य केलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.