Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

बीड जिल्ह्यात चंदन तस्कराला अटक ३९ हजारांचा मुद्देमाल जप्त, चकलांबा पोलिसांची कारवाई

बीड जिल्ह्यात चंदन तस्कराला अटक
३९ हजारांचा मुद्देमाल जप्त, चकलांबा पोलिसांची कारवाई



बीड ः खरा पंचनामा

बीड जिल्ह्यातील कोळगाव-मातेरी रस्त्यावर चंदनाची तस्करी करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून ३९ हजार रूपये किमतीचे साडेतीन किलो चंदन जप्त करण्यात आल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली. 

भारत विक्रम जाधव (वय ४५, रा. मिडसावंगी, जि. अहमदनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सहायक निरीक्षक श्री. एकशिंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला गुन्हेगारांवर नजर ठेवून कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पथक गुन्हेगारांचा शोध घेत होते. त्यावेळी एकजण चंदनाचे झाड तोडून त्यातील गाभा घेऊन दुचाकीवरून कोळगाव-मातेरी रस्त्यावरून जाणार असल्याची माहिती एकशिंगे यांना खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी या मार्गावर सापळा लावला होता.  

मिळालेल्या माहितीनुसार संशयित दुचाकीवरून आल्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील पोत्याची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये साडेतीन किलो चंदनाचा गाभा आढळून आला. शिवाय झाड तोडण्याचे साहित्यही सापडले. त्यानंतर त्याला अटक करून चोरलेले चंदन, दुचाकी, साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्याविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. बारगजे, किरण मिसाळ, श्री. गुजर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.