Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

रेल्वेखाली उडी घेऊन टाकवडेच्या प्रेमी युगुलाची आत्महत्या

रेल्वेखाली उडी घेऊन टाकवडेच्या प्रेमी युगुलाची आत्महत्याकोल्हापूर : खरा पंचनामा

हातकणंगले तालुक्यातील तारदाळ येथे प्रेमी युगुलाने रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास उघडकीस आली. 

किरण अमोल कांबळे (18) व साहिल राजेंद्र कांबळे (25, दोघे रा. टाकवडे, ता. शिरोळ) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत. प्रेमाला कुटुंबीयांकडून विरोध होत असल्याने दोघांनी आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याबाबतची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

टाकवडेमध्ये राहणाऱ्या किरण व साहिलचे एकमेकांवर प्रेम होते. या प्रेमसंबंधाला घरच्यांचा विरोध होता. काही दिवसांपूर्वी दोघांनाही घरच्यानी समज दिली होती. किरण महाविद्यालयीन शिक्षण घेत होती तर साहिल हा पेंटिंगसह तारदाळ येथील एका फौंड्री कारखान्यात कामास होता. 

किरण सकाळी कॉलेजला जातो, असे सांगून बाहेर पडली होती. सायंकाळी पाचच्या सुमारास साहिल व किरण हे दोघेही दुचाकीवरून तारदाळ येथील फिल्टर हाऊसजवळ रेल्वे रुळाशेजारी बराच वेळ बोलत बसल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

हातकणंगलेहून जयसिंगपूरकडे जाणाऱ्या रेल्वेखाली दोघांनीही एकाच वेळी उडी घेऊन जीवन यात्रा संपविली. काही वेळातच येथून जाणाऱ्या शेतकऱ्यांना ही घटना निदर्शनास आली. शेजारीच असणाऱ्या कारखान्यात साहिलचा भाऊ कामास आहे. त्याने घटनास्थळी येऊन मृतदेहांची ओळख पटवली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.