मुख्यमंत्र्यांच्या सभा मार्गावर उद्धव ठाकरे यांचे बॅनर!
कोल्हापुरात दोन्ही शिवसेनेत रंगली चुरस आणि खुन्नस
कोल्हापूर : खरा पंचनामा
शिवसेनेचे राष्ट्रीय महाअधिवेशन कोल्हापुरात शुक्रवारपासून होत आहे. त्याअंतर्गत शनिवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा गांधी मैदानात होणार असून त्या मार्गावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे बॅनर झळकल्याने तो शहरात चांगलाच चर्चेचा विषय झाला. त्यानिमित्याने दोन्ही शिवसेनेतील चूरस आणि खून्नसही पाहायला मिळत आहे.
ठाकरे शिवसेनेचे शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांनी ही बॅनर लावली. त्यातून तणाव होवू नये म्हणून पोलिसांनी त्यातील दोन बॅनर काढली तरी अजूनही दोन बॅनर झळकत आहेत. ठाकरे यांच्या बॅनरला विरोधक भ्याले अशी प्रतिक्रिया इंगवले यांनी व्यक्त केली आहे.
स्थानिक राजकारणात इंगवले व शिंदे शिवसेनेचे कोल्हापूरातील प्रमुख नेते राजेश क्षीरसागर यांच्या गेल्या दोन वर्षापासून कमालीचा राजकीय संघर्ष सुरु आहे. शिवसेना एकत्रित असताना इंगवले यांना शहरप्रमुख पदावरून दूर केल्याचे निमित्त झाले व तेव्हापासून हा वाद सुरु झाला. आता क्षीरसागर यांच्या प्रत्येक कृत्याला इंगवले जोरदार प्रत्युत्तर देत आहेत.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.