Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा! कांदा निर्यातबंदीवरुन जयंत पाटील भडकले

व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा!
कांदा निर्यातबंदीवरुन जयंत पाटील भडकलेमुंबई : खरा पंचनामा

राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला आहे. कांद्याच्या दरात घसरण होत आहे. अशातच कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसतोय. दरम्यान, कांदा निर्यातबंदीच्या मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. कांदा निर्यात बंदी उठवली म्हणून काही जण उगाच टाळ्या वाजवत होते. सत्य परिस्थिती ही आहे की कांदा निर्यातबंदी उठवलेलीच नाही. व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा असल्याचं पाटील यांनी म्हटलंय. X (पूर्वीचे ट्विटर) यावरून जयंत पाटील यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

सरकारनं कांदा निर्यातीवरील बंदी उठवल्याच्या बातम्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. मात्र, कांद्याच्या निर्यातीवरील बंदी प्रत्यक्षात उठवण्यात आलेली नाही. या केवळ अफवाच आहेत. सरकारनं याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं आहे. यावरुन जयंत पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

चालू रब्बी हंगामात राज्यात 4 लाख 32 हजार 798 हेक्टरवर कांदा लागवड झाल्याची माहिती आहे. त्यातून हंगामअखेर सुमारे 86 लाख टन कांदा उत्पादनाचा अंदाज आहे. सरकार निर्यातबंदी कायम ठेवत असेल तर कांद्याच्या दरात आणखी घसरण होऊ शकते. शेतकऱ्यांचे पुन्हा अजून नुकसान होऊ शकते असं जयंत पाटलांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलंय.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.