Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"30 रुपये लिटरचं दूध 143 रुपयांनी विकलं, हाच विकास करण्यासाठी तिकडे गेलात का?"

"30 रुपये लिटरचं दूध 143 रुपयांनी विकलं, हाच विकास करण्यासाठी तिकडे गेलात का?"मुंबई : खरा पंचनामा

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी शासकीय आश्रम शाळेसाठी वितरित करण्यात येणाऱ्या दुधामध्ये घोटाळा झाल्याचा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी पुराव्यांसह आकडेवारी सादर करुन जादा दराने दूध विकल्याचा आरोप केला आहे. विकास करण्यासाठी तिकडे गेले, असं सांगणाऱ्यांनी हाच विकास करण्यासाठी तिकडे जाण्याचा निर्णय घेतला का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

रोहित पवार म्हणाले की, राज्यात ५५२ आश्रमशाळा आहेत. आदिवासी समाजातील लहान मुलं तिथे शिकतात. राज्य शासन या मुलांच्या भरणपोषणासाठी अडीचशे एमएल दूध दररोज मुलांना देतं. तसं जीआरमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. परंतु मागच्या काही दिवसांपासून या दूध वितरणामध्ये घोटाळा झाल्याचं रोहित पवार म्हणाले.

पवार पुढे म्हणाले, अज्ञात व्यक्तीने ११ फाईल्स माझ्या कार्यालयात पाठवल्या आहेत. त्यामध्ये विद्यमान सरकारमध्ये झालेल्या घोटाळ्याची संपूर्ण माहिती आहे. दूध वितरणाचा पूर्वीचा करार ५० रुपये लिटरने होता आता १४३ रुपये लिटरने दूध दिलं जात आहे. विशेष म्हणजे चांगल्या क्वालिटीचं दूध जास्तीत जास्त ३० रुपये लिटरने मिळतं.

"पुणे जिल्ह्यात आंबेगाव तालुक्यात एक प्रायव्हेट कंपनी आहे. त्या कंपनीबोरबर करार करुन कंत्राटदाराने आश्रम शाळेमध्ये दुधाचा पुरवठा केली. शासन आदेशामध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला २५० एमएल दूध देणं बंधनकारक असताना प्रत्यक्षात २०० एमएल दूध गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना दिलं जात आहे. या कंत्राटासाठी ८० कोटी रुपयांची दलाली दिली गेली आहे." असा गौप्यस्फोट रोहित पवारांनी केला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.