Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाज सांगली, हातकणंगलेतून उमेदवार देणार! दोन दिवसांत सांगलीत बैठक, जरांगेना अहवाल पाठवणार

मराठा समाज सांगली, हातकणंगलेतून उमेदवार देणार!
दोन दिवसांत सांगलीत बैठक, जरांगेना अहवाल पाठवणारसांगली ः खरा पंचनामा

ओबीसीतून आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. कोणत्याही राजकीय नेत्याने समाजाच्या आरक्षणप्रश्नी आवाज न उठवल्याने लोकसभा निवडणुकीत नेत्यांना धडा शिकवण्याचा निर्णय काल झालेल्या अंतरवाली सराटी येथील बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार सांगलीतील सकल मराठा समाजाची बैठक गुरुवारी घेण्यात येणार आहे. यामध्ये सांगली आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून मराठा समाजाचा उमेदवार देण्याबाबत सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहे. त्या बैठकीचा अहवाल मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांना पाठवण्यात येणार आहे.  

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मराठा समाजाची भूमिका जाहीर करण्यासाठी काल अंतरवाली सराटी येथे समाजाची बैठक पार पडली. या बैठकीत जरांगे-पाटील यांनी दोन पर्याय दिले आहेत. शिवाय कोणत्याही राजकीय पक्षांच्या सभांना न जाता समाजाचाच उमेदवार देण्यात यावा यावर एकमत झाले. ५०० हून अधिक उमेदवार उभे केल्यास मतांचे विभाजन होऊन त्याचा फायदा प्रस्थापितांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मराठा समाजातीलच अपक्ष उमेदवार लोकसभेसाठी उभे केले जातील असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. त्याशिवाय राखीव मतदारसंघात मराठा समाजाला पाठींबा देणाऱ्या उमेदवाराच्या पाठीशी समाजाने उभे रहावे असाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

अंतरवाली सराटी येथे झालेल्या या बैठकीनंतर सांगली आणि हातकणंगले मतदारसंघातून मराठा समाजाचा उमेदवार उभा करण्यासंदभार्त गुरुवात दि. २८ मार्च रोजी सकल मराठा समाजाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास मराठा सेवा संघ सांस्कृतीक भवन येथे ही बैठक होणार आहे. या बैठकीत सांगली जिल्ह्याची भूमिका तसेच संभाव्य उमेदवारांना मत मांडता येणार आहे. शिवाय समाजातील लोकांनीही या बैठकीला उपस्थित राहून आपले मत मांडावे असे आवाहनही करण्यात आले आहे. या बैठकीत होणाऱ्या निर्णयाबाबत मनोज जरांगे-पाटील यांना अहवाल सादर करण्यात येणार असल्याचेही संयोजकांनी सांगितले. 

सांगलीतून या नावांची चर्चा 
मराठा समाजातर्फे अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यासाठी सांगली लोकसभा मतदारसंघातून मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विलासराव देसाई, डॉ. संजय पाटील तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते महेश खराडे यांच्या नावाची चर्चा आहे. गुरुवारी होणाऱ्या बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे. या बैठकीत यातील एक नाव निश्चीत होण्याची शक्यता आहे. 

हातकणंगलेमधून या नावांची चर्चा
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातही मराठा समाजातर्फे अपक्ष उमेदवार देण्यात येणार आहे. या मतदारसंघातून शाहुवाडीचे आबासाहेब पाटील, उमेश कुरळपकर, प्रवीण पाटील, दिग्विजय पाटील, सुरेश पाटील यांच्या नावाची मराठा समाजामध्ये चर्चा आहे. गुरुवारी सांगलीत होणाऱ्या बैठकीत यातील एका नावावर शिक्कामोरतब  होण्याची शक्यता आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.