Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक घातक शस्त्रसाठ्यांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई

दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक
घातक शस्त्रसाठ्यांसह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त, सांगली शहर पोलिसांची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

हातात कोयते, तलवारी, चाकू अशी धारधार शस्त्रे घेऊन दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून शस्त्रसाठ्यासह सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सांगली शहरचे पोलिस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली.  

मोहन दीपक वाघमारे (वय ३१, रा. संजयनगर, सांगली), आदित्य चंद्रकांत भिसे (वय २०), टिपू हसन जमादार (वय २०, दोघेही रा. माळीवस्ती, सांगली), नामदेव पंडित तपले (वय ३२, रा. गवळी गल्ली, सांगली), गणेश अनिल बिरूणगी (वय २८, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. त्यानंतर शहरचे पोलिस निरीक्षक श्री. मोरे यांनी शस्त्रे घेऊन फिरणाऱ्यांसह आचारसंहिता भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना श्री. मोरे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या होत्या.  

गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक शहरात गस्त घालत असताना सांगली-इस्लामपूर बायपास रस्त्यावर काही तरूण हातात घातक शस्त्रे घेऊन लुटण्याच्या उद्देशाने थांबल्याची माहिती पथकाला मिळाली. पथकाने तेथे धाव घेऊन तरूणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन तलवारी, तीन कोयते, चाकू, कुकरी, तीन दुचाकी, एक मोपेड, ८ मोबाईल असा सव्वातीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सहाजणांना अटक करून पाच अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. 

सांगली शहरचे पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव, निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण, महादेव पोवार, सचिन शिंदे, संदीप पाटील, मच्छिंद्र बर्डे, विनायक शिंदे, गणेश कांबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, योगेश सटाले, पृथ्वीराज कोळी आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.