'अजितदादा यांच्या गटातील एका मंत्र्याने दिला राजीनामा'
मुंबई : खरा पंचनामा
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. मनसेची महायुतीत त्यामुळे एण्ट्री होणार का असा सवाल केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हीतासाठी या महाशक्तीविरोधात लढणाऱ्या व्यक्तीची गरज असताना राज ठाकरे यांनी भाजपात जाऊ नये अशी मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे. तसेच अजितदादा गटातील एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोटही रोहीत पवार यांनी केला आहे.
रोहीत पवार म्हणाले, राज ठाकरे यांच्या भाषणाचा आपणही चाहते आहोत. त्यांनी केंद्राविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राच्या हीतासाठी महाविकास आघाडीत यायला हवे. साल 2019 मध्ये भाजपाने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते. मात्र आता पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. म्हणून त्यांनी छोट्या पक्षांना भाव देण्याचे धोरण आरंभले असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. अजितदादा गटातील एका मंत्र्याने एक- दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. कृषी खात्याशी संबंधित हा मंत्री आहे. शेतक-यांच्या कुठल्याही प्रश्नावर सध्या चर्चा होत नाही, त्यामुळे कंटाळून त्याने राजीनामा दिला आहे. शेतकरी सध्या वाऱ्यावर आहेत. अजितदादा गटातील अनेक आमदार भाजपात जाणार आहेत आणि उरलेले आमच्याकडे येणार असल्याचा दावाही रोहीत पवार यांनी केला आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.