Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू

मराठा समाजाकडून राज्यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात सर्वेक्षण सुरू



जालना : खरा पंचनामा

सगेसोयरे अध्यादेश जारी करून मराठा सामाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी राज्यात मराठा समाज आक्रमक झाला आहे. आरक्षणाच्या भूमिकेवर ठाम असलेल्या मराठा समजाकडून काल आंतरवाली सराटी गावामध्ये आरक्षणाची पुढील भूमिका ठरवण्यासाठी लाखो मराठा समाजाच्या उपस्तितीत बैठक पार पडली.

या बैठकीत मराठा समाजाकडून राज्यात लोकसभा निवडणुकीत एकच अपक्ष उमेदवार रिंगणात उतरवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.

त्याचबरोबर हा निर्णय घेताना गावागावत बैठक घेऊन इतर पक्षाचे ज्याप्रमाणे सर्वेक्षण करण्यात आले त्याचप्रमाणे 30 मार्चपर्यंत मराठा समाजाचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 30 मार्चनंतर मराठा सामज लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय घेणार आहेत. काल झालेल्या बैठकीनंतर मराठा समाजाकडून गावागावात सर्वेक्षणाचे काम सुरू करण्यात आले आहे.

सर्वेक्षण फॉम :-
1. मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी राजकारणात यावे का?.... होय/नाही
अभिप्राय.
2. मराठा समाजानी येणारी लोकसभा निवडणूक लढवावी का.?.... होय / नाही
अभिप्राय.
3. लोकसभा निवडणूक प्रत्येक जिल्हातून एक अपक्ष उमेदवार द्यावा का.?.... होय / नाही
अभिप्राय........
4. प्रत्येक गावातून दोन उमेदवार योग्य का?.... होय/नाही
अभिप्राय...
5. कोणत्याही राजकीय एका पक्षाला आपण पाठिबा देणे योग्य का.?... होय/नाही
अभिप्राय.......
6. आपल्या कटुंब मतदान संख्या किती ?.... सख्या,
7. आरक्षण प्रश्न मार्गी लावणारा कोणत्याही जाती धर्माचा उमेदवार चालणार का.?... होय / नाही किंवा फक्त मराठा
अभिप्राय,.....
8. जिल्हातून लोकसभा मराठा समाजच्या निश्चित उमेदवार यांना तुम्ही मतदान करणार का.?... होय/नाही
अभिप्राय.

हे आठ प्रश्न प्रमुख्याने विचारण्यात आले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.