Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

चकलांबा येथे ड्राय डेला मोठा दारू साठा जप्त दोघांना अटक, सपोनि नारायण एकशिंगे यांची माहिती

चकलांबा येथे ड्राय डेला मोठा दारू साठा जप्त
दोघांना अटक, सपोनि नारायण एकशिंगे यांची माहिती



बीड ः खरा पंचनामा

बीड जिल्ह्यातील चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ड्राय डे दिवशी मोठा दारू साठा जप्त करण्यात आला. यावेळी २२ हजारांची देशी-विदेशी दारू जप्त करून दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक नारायण एकशिंगे यांनी दिली. 

संदीपान सिताराम शेंबडे (वय ३८, रा. तांदळा, ता. गेवराई), राजेंद्र उर्फ नाना नाटकर (रा. राक्षसभवन, ता. गेवराई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. रविवारी चकलांबा पोलिस ठाण्याच्या हद्दीत ड्राय डे होता. त्यावेळी सहायक निरीक्षक एकशिंगे यांचे पथक गस्त घालत होते. राक्षसभवन फाटा ते राक्षसभवन या रस्त्यावर एका पत्र्याच्या शेडमध्ये एकजण देशी, विदेशी दारूची विक्री करत असल्याची माहिती पथकाला मिळाली. तसेच कोळगाव ते तांदळा रस्त्यावर एकजण अवैधरित्या दारू विक्री करत असल्याचीही माहिती पथकाला मिळाली. 

पथकाने दोन्ही ठिकाणी छापा टाकून दोन्ही संशयितांना अटक केली. त्यांच्याकडून २२ हजार रूपये किमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. त्यांच्याविरोधात चकलांबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

चकलांबा पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक निरीक्षक नारायण एकशिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामेश्वर इंगळे, श्री. कुमावत, श्री. खटाणे, श्री. जमादार आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.