Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

आयपीएल सामन्याने घेतला एकाचा बळी!

आयपीएल सामन्याने घेतला एकाचा बळी!



सांगली : खरा पंचनामा

क्रिकेटचा T- 20 चा थरार आयपीएलमधून मिळत असतो. मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू रोहित शर्मा याचे सपोर्टर खूप आहेत. रोहित शर्मा याला कर्णधारपदावरुन काढल्यानंतर सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सविरोधात मोहीम सुरु झाली होती. परंतु कोल्हापूर शहरात आयपीएलमुळे एकाचा मृत्यू झाला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर जल्लोष करणाऱ्या एकाला जबर मारहाण करण्यात आली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

कोल्हापूरमधील हणमंतवाडी (ता. करवीर) येथे बुधवारी रात्री ही घटना घडली. बुधवारी २७ मार्च रोजी रात्री दहाच्या सुमारास बंडू तिबिले, सागर झांजगे व बळवंत झांजगे आयपीएलचा सामना पाहत होते. मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग असा हा सामना सुरु होता. त्यावेळी रोहित शर्मा बाद झाला. बंडूपंत तिबिले यांनी त्याचा आनंद साजरा केला. त्याचा राग सागर झांजगे व बळवंत झांजगे यांना आला. त्यांनी बंडूपंत तिबले यांना दांडक्याने जबर मारहाण केली. त्यानंतर त्यांच्या कानातून नाकातून रक्तप्रवाह थांबत नव्हता. त्यात बंडूपंत गंभीर जखमी झाला.

गंभीर जखमी झालेल्या बंडूपंत तिबिले यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना तीन दिवसानंतर त्याचा मृत्यू झाला. तिबिले यांच्या मागे पत्नी, तीन मुली, जावई, मुलगा, नातवंडे, भाऊ-बहीण असा मोठा परिवार आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी सागर झांजगे व बळवंत झांजगे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.