Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'एकनाथ शिंदेंनी माघार घ्यायला सांगितलं, तर...'

'एकनाथ शिंदेंनी माघार घ्यायला सांगितलं, तर...'



पुणे : खरा पंचनामा

बारामती लोकसभेला अजित पवार यांनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला आहे. एकीकडे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी प्रतिष्ठेची लढत चर्चेत आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवणारच असे म्हटले आहे.

माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज सासवडमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती. या बैठकीत शिवतारे यांच्या उमेदवारीचा ठराव एक मताने मंजूर करण्यात आला. त्यामुळे विजय शिवतारे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे चित्र आहे. त्यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याचे सांगितल्याने बारामतीत महायुतीच्या अडचणी वाढल्याचे दिसून येते.

विजय शिवतारे म्हणाले की, एकमताने ठराव पास करण्यात आला आहे. बारामती लोकसभा मतदारसंघ हा काय कोणाचा सातबारा नाही. मी देशातील 543 मतदारसंघापैकी एक लोकसभेच्या मतदारसंघ आणि मालकी कोणाची नाही. सहा विधानसभेचे मतदारसंघ आहे. आपला स्वाभिमान जागृत होऊन आपण लढलं पाहिजे. विशेषतः अजित पवार 2019 च्या निवडणुकीमध्ये मी जरी त्यांच्या मुलाविरुद्ध प्रचार केला होता तो राजकारणाचा एक भाग होता आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. वैयक्तिक काही नव्हतं.

अजित पवार जिंकू शकत नाहीत या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. अजित पवारांचा उर्मटपणा आहे. अजित पवारांनी मला दुर्लक्ष केलं आहे. मला लोकांनी सांगितले याला धडा शिकवला पाहिजे. अजित पवार रेसमध्ये नाहीत. एकनाथ शिंदे यांनी माघार घ्या, असे सांगितले तरी देखील मी लोकांचे ऐकेल, असे यावेळी विजय शिवतारे म्हणाले आहेत.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.