Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'त्या' ग्रामपंचायत सदस्याचा खून नाहीच रस्त्यावर पडून आपटल्याने झाला मृत्यू, जत पोलिसांत नोंद

'त्या' ग्रामपंचायत सदस्याचा खून नाहीच
रस्त्यावर पडून आपटल्याने झाला मृत्यू, जत पोलिसांत नोंदसांगली ः खरा पंचनामा

जत तालुक्यातील उमराणी येथील ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे याचा खून झाला नसून त्याचा आकस्मिक मृत्यू झाल्याची नोंद जत पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. त्याचा खून झाल्याची कोणतीही तक्रार पोलिसांना प्राप्त झाली नसल्याची माहिती जतचे पोलिस निरीक्षक सूरज बिजली यांनी दिली.  

उमराणी ते सिंदूर रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी सातच्या सुमारास दोन गटात वाद झाला होता. तो वाद मिटला होता. मात्र दोन्ही गटात राग धुमसत होता. त्यानंतर रात्री एकच्या सुमारास पुन्हा हा वाद उफाळून आला. त्यावेळी ग्रामपंचायत सदस्य अमर कांबळे जाब विचारण्यासाठी गेला होता. त्यावेळी तो अचानकपणे डांबरी रस्त्यावर आपटला. त्यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला.  

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जत पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह जत येथील शासकीय रूग्णालयात हलवण्यात आला. तेथे उत्तरीय तपासणी केल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी त्याच्यावर नातेवाईकांनी अंत्यसंस्कारही केले. याबाबत कोणीही अमर कांबळे याचा खून झाल्याची तक्रार दिली नाही. त्यामुळे या घटनेची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आल्याचेही निरीक्षक बिजली यांनी सांगितले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.