Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही अजित पवारांच्या सख्ख्या भावाने साथ सोडली!

भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही 
अजित पवारांच्या सख्ख्या भावाने साथ सोडली!बारामती : खरा पंचनामा

अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांना पवार कुटुंबातूनच विरोध होतांना पाहायला मिळाला होता. विशेष म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अजित पवारांनी ज्या व्यक्तीकडून सल्ले घेतले त्या श्रीनिवास पवारांनी देखील अजित पवारांची साथ सोडली असल्याचे पाहायला मिळत आहे.

बारामतीमधील काटेवाडी येथील गावकऱ्यांशी श्रीनिवास पवार यांनी संवाद साधतांना त्यांनी अजित पवारांचा निर्णय पटला नसल्याचे बोलून दाखवले. भाऊ म्हणून तुझं सगळं ऐकलं, पण आता नाही असे म्हणत अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांची साथ सोडली आहे.

यावेळी बोलतांना श्रीनिवास पवार म्हणाले की, "तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल की मी दादांच्या विरोधात कसा?, मी नेहमी त्याला साथ दिली. भाऊ म्हणून तो म्हणेल तशी मी उडी मारली. दादांची माझी चर्चा झाली, त्यावेळेस मी त्याला म्हटलं आमदारकीला तू आहेस, तर खासदारकी साहेबांना दिली पाहिजे. कारण साहेबांचे आमच्या वरती उपकार आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेत.

जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचं नाही. ज्यांना कुणाला काही पद मिळाली ती साहेबांमुळे मिळाले. साहेबांना म्हणायचे कीर्तन करा, घरी बसा हे काय मला पटलं नाही. मी वेगळा माणूस आहे. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले (भरणेंना टोला), औषध विकत आणतो त्याला एक्सपायरी डेट असते. तशी नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. वाईट वाटून घ्यायचं नाही. मला दबून जगायचं नाही, जगायचं तर स्वाभिमानाने. जे लाभार्थी आहेत त्यांच्यामागे जायचं मला वाटत नाही, असे श्रीनिवास पवार म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.