Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

एकाचा वाकून नमस्कार, दुस-याने खांद्यावर हात ठेवला! दोन राजेंच्या भेटीचे चित्र पाहून सातारकरही सुखावले

एकाचा वाकून नमस्कार, दुस-याने खांद्यावर हात ठेवला!
दोन राजेंच्या भेटीचे चित्र पाहून सातारकरही सुखावलेसंभाजी पुरीगोसावी
सातारा : खरा पंचनामा

बऱ्याच कालावधीनंतर शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले एकत्र आलेले पाहायला मिळाले. शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसा निमित्तांने त्यांची भेट झाली. उदयनराजे यांनी आमदार शिवेंद्रराजेंची भेट घेवुन त्यांना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. माझ्या हृदयात शिवेंद्रराजे मरेपर्यंत राहतील असे उदयनराजे म्हणाले तर महाराजांच्या आशीर्वादाने दहा हत्तीचं बळ मला मिळाले असेही आमदार शिवेंद्रराजे भोसले म्हणाले.

सध्या राज्यामध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रांत नवनवीन आघाड्या, युती किंवा एकमेकांच्या कट्टर विरोधक असलेल्या नेत्यांचे मनोमीलन होताना दिसून येत आहे. साताऱ्यात शनिवारी असाच एक प्रसंग सातारकरांना अनुभवायला मिळाला. सातारच्या राजकारणात छत्रपती  शिवरायांचे वंशज असलेल्या खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यातील वाद हा नवीन नाही. परंतु शनिवारी आमदार शिवेंद्रराजे यांच्या वाढदिवसा निमिंत्ताने सातारकरांना एक वेगळेच दृश्य पाहायला मिळाले खासदार उदयनराजेंनी त्यांच्या घरी जावुन वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या एवढेच नव्हे तर उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यावर अक्षरशः प्रेमाचा वर्षाव केला. 

उदयनराजे भोसले हे भाजपकडूंन सातारा लोकसभा निवडणुक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. याच पार्श्वभूमीवर ही महत्त्वांची भेट मानली जात आहे. परंतु उदयनराजे यांनीही राजकीय स्वरूपाची भेट नसल्यांचे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी उदयनराजेंनी आपल्या नेहमीच्या मोकळ्याढाकळया शैलीत शिवेंद्रराजे यांच्याविषयी आपल्या मनात कोणतीही कटूतना नसल्याचे सांगितले, यावेळी त्यांनी आपल्या बंधूंना वाढदिवसांच्या शुभेच्छा दिल्या. 

खासदार उदयनराजे भोसले हे शिवेंद्रराजेंना शुभेच्छा देताना चांगलेच भावनिक झाले होते. यावेळी शिवेंद्रराजे म्हणाले की उदयनराजेंचं वर काय चाललंय हे मला माहित नाही मी छोटा आहे मी सातारा जावलीपलीकडे जात नाही असेही आमदार शिवेंद्रराजे  भोसले म्हणाले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.