भिवर्गी शाळेतील साहित्य चोरणाऱ्यास अटक
६१ हजारांचा मुद्देमाल जप्त, उमदी पोलिसांची कारवाई
सांगली ः खरा पंचनामा
जत तालुक्यातील भिवर्गी येथील नूतन महाविद्यालयात चोरी करणाऱ्या तरूणास अटक करण्यात आली. त्याच्याकडून लॅपटाॅप, प्रिंटर, अॅम्प्लीफायर असा ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली.
नवनाथ अमगोंडा कराडे (वय २१, रा. करेवाडी, ता. जत) असे अटक केलेल्याचे नाव आहे. दि. २६ फेब्रुवारी रोजी भिवर्गी येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कायार्लय फोडून अज्ञाताने साहित्य चोरून नेल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर राजकुमार बसर्गी यांच्या तक्रारीनुसार अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयितांना पकडण्यासाठी सहायक निरीक्षक शिंदे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाला सूचना दिल्या होत्या. पथक संशयितांचा शोध घेत होते.
सहायक निरीक्षक शिंदे यांना भिवर्गी शाळेतील साहित्य चोरणारा एका फाट्यावर चोरीचे साहित्य घेऊन थांबल्याची माहिती खबऱ्याद्वारे मिळाली. त्यांनी तेथे छापा टाकून त्याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ लॅपटाॅप, प्रिंटर, अॅम्ल्पीफायर असे साहित्य सापडले. त्याला अटक करून त्याच्याकडील साहित्य जप्त करण्यात आले.
उमदीचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आप्पासाहेब हाके, राम बन्नेनवार, मनिष कुमरे, संजय पांढरे, सुदर्शन खोत, विक्रम राठोड आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.