Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पाटबंधारेचा शाखा अभियंता राहुल खाडे कुटुंबियांसह फरारी १.२ कोटीच्या अपसंपदेप्रकरणी सांगलीत गुन्हा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

पाटबंधारेचा शाखा अभियंता राहुल खाडे कुटुंबियांसह फरारी
१.२ कोटीच्या अपसंपदेप्रकरणी सांगलीत गुन्हा, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई



सांगली ः खरा पंचनामा

सांगली जिल्हा परिषदेकडील छोटे पाटबंधारेकडील तत्कालीन शाखा अभियंता राहुल खाडे याने १९८९ ते २०१५ या काळात ज्ञात स्त्रोतापेक्षा अन्य मार्गाने तब्बल १.२ कोटींचा अपसंपदा जमवली आहे. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने खुली चौकशी केली. त्यात हा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राहुल खाडेसह त्याच्या कुटुंबातील तिघांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गु्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर तो फरारी झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांनी दिली.

राहुल विठ्ठल खाडे, त्याची पत्नी सरोजिनी राहुल खाडे, मुलगी विशाखा राहुल खाडे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. राहुल खाडे याने भ्रष्ट व गैर मार्गाने अपसंपदा कमवल्याबाबत सांगलीतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर खाडे याची उघड चौकशी करण्यात आली होती. १९८९ ते २०१५ या कालावधीत खाडे व त्याच्या कुटुंबियांनी धारण केलेल्या संपतीची चौकशी करण्यात आली. त्यामध्ये त्याच्या ज्ञात उत्पन्न स्त्रोताव्यतिरिक्त भ्रष्ट व गैर मार्गाने तब्बल १.२ कोटींची अपसंपदा जमवल्याचे स्पष्ट झाले होते. याप्रकरणी खाडेसह त्याच्या कुटुंबियांवर जुलै २०१० मध्ये विश्रामबाग पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्ह्यात खाडे आणि त्याच्या पत्नीला जामीन मंजूर झाला होता. जामीन मंजुर झाल्यापासून खाडे आणि त्याचे कुटुंबिय फरारी झाले आहेत असेही उपअधीक्षक पाटील यांनी सांगितले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दत्तात्रय पुजारी यांनी केली. 

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.