पुणे सीआयडी पोलीस निरीक्षकाचा परळी रेल्वे स्थानकावर आढळला मृतदेह
छत्रपती संभाजीनगर : खरा पंचनामा
परळी रेल्वे स्थानकानजीकच्या रुळावर शनिवारी सकाळी पुणे विभागातील राज्य गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सुभाष भीमराव दुधाळ (वय ४२) यांचा मृतदेह दोन तुकडे झालेल्या अवस्थेत आढळून आला.
सुभाष दुधाळ यांची आत्महत्या की अपघात आहे, याची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दुधाळ यांच्या शरीराचे कमरेपासून दोन तुकडे झाले आहेत.
ही घटना शनिवारी सकाळी ७ वाजता पोलिसांना परळी रेल्वे स्टेशन मास्तरांनी कळवली. त्यानंतर पंचनामा करून दुधाळ यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान दुधाळ यांनी आत्महत्या केली की त्यांचा अपघाती मृत्यू झाला, ते परळी येथे कशासाठी आले होते, याबाबत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र या घटनेने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.