Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात! उमेदवार पाडापाडीची ट्रीक

हातकणंगलेत 2 सत्यजित, 2 धैर्यशील रिंगणात!
उमेदवार पाडापाडीची ट्रीक इचलकरंजी : खरा पंचनामा

निवडणुकीत विजयी होण्यासाठी नेत्यांकडून वेगवेगळ्या खेळ्या सुरुच असतात. काही वेळेस मतविभाजन करुन विजय मिळवणे, हा पर्यायही नेत्यांना आजमावून पाहतात. असाच प्रकार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात करण्यात आलाय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात पाडापाडीच्या राजकारणाला वेग आलाय. ठाकरेंचे उमेदवार सत्यजित पाटील आणि शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या नावाशी साधर्म्य असणारे लोक शोधून त्यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांना डमी उमेदवाराचा फटका बसला होता. बहुनज महापार्टीने राजू शेट्टी नाव असलेल्या उमेदवाराला निवडणुकीत उतरवले होते. त्यामुळे राजू शेट्टी यांना फटका बसला होता. डमी राजू शेट्टीने 8 हजार मतं खाल्ली होती.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात चौरंगी लढत पाहायला मिळत आहे. ठाकरे गटाने सत्यजीत पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून धैर्यशील माने पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. याशिवाय राजू शेट्टी यांनी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलाय. तर वंचित बहुजन आघाडीने कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डी. सी. पाटील यांना हातकणंगलेत उमेदवारी दिली आहे. प्रकाश आवाडे यांनी निवडणुकीत माघार घेतल्यानंतर हातकणंगलेमध्ये पंचरंगी लढत चौरंगी लढतीवर आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.