पार्थ भाऊ म्हणून सांगतो, 2019 मधील तुझा पराभव विसरलो नाही, पण अजितदादा...
पुणे : खरा पंचनामा
मावळ लोकसभा क्षेत्रात 2019 मधील लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना धक्का बसला होता. शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार याचा पराभव केला होता. आता अजित पवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचार करत आहेत.
त्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते रोहित पवार यांनी अजित पवार आणि पार्थ पवार यांनी डिवचले आहे. भावनिक होऊन पार्थला साद रोहित पवार यांनी घातली आहे. पार्थ भाऊ म्हणून सांगतो, 2019 मधील तुझा पराभव विसरलो नाही, असे रोहित पवार यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले.
पार्थला भाऊ म्हणून सांगतो, 2019 ला पार्थ मावळ लोकसभा मतदार संघात उभा होता. त्यावेळी महायुतीच्या विरोधात प्रचार केला होता. पार्थ याचा मोठ्या मताधिक्याने पराभव झाला होता. तो पराभव पार्थ विसरला नसेल. त्याचा भाऊ म्हणून मी आज येथे प्रचाराला आलो आहे. परंतु मुलाचा पराभव करणाऱ्याच्या विजयासाठी अजित पवार आले आहेत. ते कुठल्या पातळीवर गेले आहेत, असा टोला रोहित पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना रोहित पवार म्हणाले, जयला विनंती करायची आहे. त्याने भाजपची सवय लावू घेऊ नये. भाजप सारखे खोटे बोलणार तुझी प्रतिमा करु नको. पार्थ पवार यांना दिलेल्या सुरक्षेसंदर्भात रोहित पवार यांनी टीका केली. इकडे कोयता गँगचा धुमाकूळ सुरु आहे. गुन्हेगारी वाढत आहे. त्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही देणे घेणे नाही. पार्थला वाय कशाला झेड सुरक्षा द्या, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.