Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'माफीनामा जाहिरातींच्या इतक्याच आकारात छापला का?'

'माफीनामा जाहिरातींच्या इतक्याच आकारात छापला का?'



नवी दिल्ली : खरा पंचनामा

पतंजली आयुर्वेद कंपनी विरुद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं आज खडसावत प्रश्न केला की, 'त्यांनी आज वृत्तपत्रांमध्ये दिलेला माफीचा आकार त्यांच्या उत्पादनांच्या पूर्ण पानांच्या जाहिरातींसारखा आहे का?' पतंजलीचे संस्थापक रामदेव आणि बाळकृष्ण यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी म्हणाले की, त्यांनी न्यायालयासमोर माफीनाम्याचा नवा सेट दाखल केला आहे.

काल माफी मागितली गेली आणि ती आधी मागायला हवी होती, असं खंडपीठानं म्हटलं. रोहतगी म्हणाले की, 67 वृत्तपत्रांमध्ये 10 लाख रुपये खर्चुन माफीनामा प्रकाशित करण्यात आला. 'माफी ठळकपणे प्रकाशित केली गेली आहे का? तुमच्या आधीच्या जाहिरातींप्रमाणेच फॉन्ट आणि आकार ठेवण्यात आला आहे का?' असा सवाल न्यायमूर्ती हिमा कोहली यांनी केला.

कंपनीने लाखो रुपये खर्च केल्याचे रोहतगी यांनी सांगितले तेव्हा न्यायालयानं उत्तर दिलं, 'आम्हाला याने फरक पडत नाही'.

न्यायालयानं नमूद केले की पतंजली विरुद्धच्या खटल्याबद्दल इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) विरुद्ध ₹ 1000 कोटी दंडाची मागणी करणारा अर्ज प्राप्त झाला आहे. 'ही प्रॉक्सी याचिका आहे का? आम्हाला संशय आहे', खंडपीठाने विचारल्यावर रोहतगी यांनी त्यांच्या क्लायंटचा त्याच्याशी काहीही संबंध नाही यावर जोर दिला.

त्याविरुद्ध दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या काही तास अगोदर, पतंजली आयुर्वेदने राष्ट्रीय दैनिकांमध्ये माफी मागितली आणि न्यायालयाचा त्यांना अत्यंत आदर आहे आणि त्यांच्या चुकांची पुनरावृत्ती होणार नाही अशा आशयाच्या छोट्या जाहिराती दिल्या.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.