जोतिबा मंदिर सलग 79 तास खुले राहणार; चैत्र यात्रेला प्रारंभ
मानाच्या सासनकाठ्या डोंगराकडे मार्गस्थ
वाडी रत्नागिरी : खरा पंचनामा
दख्खनचा राजा श्री जोतिबा देवाच्या चैत्र यात्रेच्या पार्श्वभूमीवर मंदिर सलग ७९ तास भाविकांसाठी खुले राहणार आहे. सोमवारी (ता. २२) पहाटे मंदिराचे दरवाजे उघडल्यानंतर ते गुरुवारी (२५) रात्री ११ वाजता बंद केले जाणार आहेत. पाडळी (जि. सातारा) येथील मानाच्या पहिल्या क्रमांकाची सासनकाठी यात्रेसाठी काल सकाळी गावातून मार्गस्थ झाली. ही सासनकाठी सोमवारी दुपारी चार वाजता डोंगरावर दाखल होईल.
दरम्यान, यात्रेच्या तयारीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, प्रांताधिकारी समीर शिंगटे, तहसीलदार माधवी शिंदे, गटविकास अधिकारी सोनाली माडकर, पोलिस उपअधीक्षक आप्पासाहेब पवार, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडग यांनी वाहन पार्किंग तसेच डोंगराकडे येणारे मार्ग, मुख्य रस्त्याचा परिसर, स्वच्छतागृह आदींची पाहणी केली. जोतिबा मंदिर मार्ग दर्शनरांग, सासनकाठी मार्गाची पाहणी केली. एस. कार्तिकेयन यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.