Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

छत्तीसगड दारू घोटाळ्याप्रकरणी IAS अधिकाऱ्याला अटक

छत्तीसगड दारू घोटाळ्याप्रकरणी IAS अधिकाऱ्याला अटक



रायपुर : खरा पंचनामा 

छत्तीसगडमधील (अंमलबजावणी संचालनालय) दारू घोटाळ्याप्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात निवृत्त आयएएस अधिकारी अनिल टुटेजा यांना अटक केली आहे. अधिकृत सूत्रांनी रविवारी ही माहिती दिली, या संदर्भातील वृत्त एएनआयने दिले आहे.

छत्तीसगड दारू घोटाळा प्रकरणात ईडीने 2003 च्या बॅचच्या अधिकाऱ्याला शनिवारी रायपूर येथील आर्थिक गुन्हे शाखा/लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरो कार्यालयातून ताब्यात घेतले होते. जिथे आयएएस अधिकारी आणि त्यांचा मुलगा यश टुटेजा याच प्रकरणात त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी गेले होते.

संबंधित आयएएस अधिकाऱ्याला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान रिमांडची मागणी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यासमोर हजर केले जाण्याची शक्यता आहे, असे सूत्रांनी सांगितले. संबंधित अधिकारी गेल्या वर्षीच निवृत्त झाले होते.

ईडीने छत्तीसगडमध्ये विकल्या जाणाऱ्या दारूच्या प्रत्येक बाटलीतून बेकायदेशीरपणे पैसे गोळा केल्याचा आरोप केला होता आणि रायपूरच्या महापौरांचे मोठे बंधू अन्वर ढेबर यांच्या नेतृत्वाखालील दारू सिंडिकेटने निर्माण केलेल्या 2,000 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगचे पुरावे सापडले होते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.