Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

Act Of God चा दावा हायकोर्टाने फेटाळला अपघाती मृत्यूप्रकरणी 40 लाखांची भरपाई देण्याचे आदेश

Act Of God चा दावा हायकोर्टाने फेटाळला
अपघाती मृत्यूप्रकरणी 40 लाखांची भरपाई देण्याचे आदेशमुंबई : खरा पंचनामा

मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय देत अपघात ही 'देवाची कृती' (Act Of God) असल्याचे नाकारला. त्याचबरोबर संबंधित प्रकरणात मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निर्णयही रद्द केला. त्याचबरोबर अपघातात मरण पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाला न्यायालयाने 40 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली.

न्यायाधिकरणाने यापूर्वी दैवी हस्तक्षेपाचे कारण सांगून एका भीषण रस्ते अपघातातचा बळी ठरलेल्या पीडित व्यक्तीच्या कुटुंबाला नुकसान भरपाई नाकारली होती. या निकालाला आव्हान देत पीडित कुटुंबाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

न्यायमूर्ती एएस चांदूरकर आणि जितेंद्र जैन यांच्या अध्यक्षतेखाली, न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले 'अॅक्ट ऑफ गॉड' अशा गोष्टी असतात ज्याचे नियंत्रण मणसाच्या हाती नसते. त्यामुळे ते या प्रकरणात लागू होत नाही.

यावेळी न्यायालयाने निरिक्षण नोंदवले की, वाहनांचे अपघात एक किंवा दोन्ही वाहनचालकांच्या निष्काळजीपणा अथवा चुकीमुळे होता. अशात अपघातावेळी कोणाचीतरी एकाची चूक असतेच.

या घटनेत राज्य परिवहन महामंडळाची बस (एसटी) आणि मारुती कार यांच्यात धडक झाली, ज्यात पीडित व्यक्तीचा मृत्यू झाला होता.

या घटनेबाबतचे सर्व पुरावे तपासल्यानंतर न्यायालयाने असे मानले की, या प्रकरणात मुंबई मोटार अपघात दावा न्यायाधिकरणाचा निष्कर्ष सदोष आहे.

प्रतिकूल हवामानाचा किंवा इतर कोणताही अनियंत्रित घटक या अपघाताला कारणीभूत असल्याचा उल्लेख नाही. त्यामुळे ही दुर्घटना 'देवाची कृती' होती असे म्हणणे अन्यायकारक ठरेल. अशा घटनांमध्ये जबाबदारीचे महत्त्व अधोरेखित करून न्यायालयाने दोन्ही चालकांना एका मर्यादेपर्यंत जबाबदार धरले.

यावेळी न्यायालयाने मारुती कारच्या विमा कंपनीने आणि एसटी महामंडळाने पीडित कुटुंबाला 6% व्याजासह 40 लाख 34 हजारांची नुकसानभरपाई संयुक्तपणे देण्याचे निर्देश दिले.

या प्रकरणातील पीडित राजेश शेजपाल रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये डेप्युटी फायनान्स मॅनेजर म्हणून काम करत होते. 14 नोव्हेंबर 1997 रोजी ते आपल्या सहकाऱ्यांसोबत मारूती कारमधून प्रवास करत होते. तेव्हा एसटी महामंडळाच्या बसने त्यांच्या कारला धडक दिली. त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला होती.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.