Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या

ठाण्यातच पोलिस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून केली आत्महत्या



नागपूर : खरा पंचनामा

शहरातील वाडी पोलीस स्टेशन अंतर्गत U.O.T.C कॅम्पमध्ये कर्तव्यावर कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

मंगेश मस्के (ब. न.1248) असे या मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. शनिवार (६ एप्रिल) क्वार्टर गार्ड म्हणून डुटीवर असताना एका खोलीत त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवपले. या घटनेने पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहचले. मनमिळाऊ स्वभावाच्या मंगेश मस्के यांनी टोकाचे पाऊल का उचलेले यासंदर्भात गूढ कायम असून पोलीस तपासात गुंतले आहेत.

यापूर्वी पुण्यातील लोहियानगर चौकीत पोलिस कर्मचाऱ्याने कार्बाइनमधून स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले. भारत दत्ता आस्मर (वय ३४) असे या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ही घटना ताजी असतानाच आता नागपुरातही पोलीस कर्मचाऱ्याने जीवन संपवल्याचे प्रकरण समोर आले आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.