Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

'तोलून मापून बोलतोय, तोंड उघडलं तर.' अजित पवार यांनी कुटुंबातील व्यक्तींना दिला इशारा

'तोलून मापून बोलतोय, तोंड उघडलं तर.'
अजित पवार यांनी कुटुंबातील व्यक्तींना दिला इशाराबारामती : खरा पंचनामा

सध्या लोकसभा निवडणुकीत राज्याचे नव्हे तर देशाचे लक्ष बारामतीकडे लागले आहे. बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे विरोधात सुनेत्रा पवार अशी नणंद- भावजय यांच्यात लढत होत आहे. पवार कुटुंबातील अजित पवार आणि शरद पवार यांच्यात ही लढत होत आहे.

या लढतीत अजित पवार यांच्या विरोधात संपूर्ण पवार कुटुंबीय उतरले आहे. अगदी शरद पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार अजित पवार यांच्या विरोधात उतरले आहेत. ते सुप्रिया सुळे यांचा जोरात प्रचार करत आहे. त्यावेळी अजित पवार यांच्यावर घणाघाती हल्ला ते करत आहेत. आता या सर्वांचा समाचार अजित पवार यांनी घेतला आहे. कोणाचे नाव न घेता कुटुंबातील लोकांना त्यांनी इशारा दिला आहे.

बारामतीमध्ये बोलताना अजित पवार म्हणाले, माझ्या निवडणुकीत कधी भावंडे फिरले नाहीत. पण आता गरागरा फिरत आहेत. पावसाळ्यात छत्री उगतात, तशी ही उगवली आहेत. मी फार तोलून मापून बोलतोय, एकदा मी जर तोंड उघडले तर कित्येक लोकांना फिरता येणार नाही. तोंड दाखवता येणार नाही. कुणी पाणी देणार नाही. मी गप्प बसलो म्हणजे फार वळवळ करता का? अशा शब्दांमध्ये अजित पवार यांनी इशारा दिला.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.