Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोपटाने सांगितले उमेदवारांचे भविष्य, पोलिसांनी मालकालाच पकडून नेले!

पोपटाने सांगितले उमेदवारांचे भविष्य, पोलिसांनी मालकालाच पकडून नेले!



चेन्नई : खरा पंचनामा

तामीळनाडूमध्ये उमेदवार विजयी होणार असे सांगणा-या ज्योतिषी पोपटला व त्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे येथील निवडणुकीत हा विषय चांगलाच चर्चेचा ठरला आहे.

तामीळनाडू मधील कुड्डालोर लोकसभा मतदार संघातील पट्टीली मक्कल काची पार्टीचे उमेदवार व चित्रपट निर्देशक थंगार बचन हे रविवारी एका मंदिरात गेले. येथे दर्शन घेतल्यानंतर त्यांनी मंदिराबाहेर भविष्य सांगणा-या पोपटाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांनी आपले निवडणूकीचे भविष्य बघण्यासाठी आग्रह धरल्यानंतर ज्योतिषी पोपटाने त्यांना विजय मिळेल असे कार्ड काढले.

या घटनेचा व्हिडिओ त्यानंतर चांगलाच व्हायरल झाला. काही तासातच या पोपटला व त्याच्या मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, ताकीद देत सोडून दिले. पण, त्यानंतर येथील राजकारण चांगलेच तापले. सत्ताधारी द्रमुक सरकारवरला पराभव दिसत असल्यामुळे त्यांनी ही कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला.

पट्टीली मक्कल काची पार्टीचे (पीएमकेचे) अध्यक्ष अध्यक्ष डॉ. अंबुमणि रामदास यांनी या कारवाईबाबत म्हटले की, कुड्डालोर मतदारसंघात थांगारबचन यांचा विजय होणार असे सांगणा-या पोपटाला व मालकाला अटक केल्याचे म्हटले आहे. मूर्ख द्रमुक सरकारच्या सूडबुद्धीला लोक धडा शिकतील! कुड्डालोर मतदारसंघातून निवडणूक लढवणारे दिग्दर्शक थंगार बचन यांनी पटाली पीपल्स पार्टीचा उमेदवार विजयी होईल, असे भविष्य पोपटाने सांगितले होते, ही वस्तुस्थिती सहन न झाल्याने द्रमुक सरकारने ही सूडबुद्धीची कारवाई केली आहे. ही कृती निंदनीय आहे कारण ती फॅसिझमची उंची आहे. विवेकवादी पक्ष म्हणवून घेणाऱ्या द्रमुकला जर एखाद्या भोंदूबाबाची सुवार्ताही सहन होत नसेल, तर तो पक्ष किती मूर्खपणा आणि अंधश्रद्धेत बुडाला आहे, हे समजू शकते.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.