Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

"मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं"

"मातोश्रीवर अटॅक करायला फडणवीसांनी सांगितलं"मुंबई : खरा पंचनामा

वेगवेगळ्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून घेरणार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंविरोधातील भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल मोठा गौप्यस्फोट केला. मुंबई Tak चावडीवर बोलताना किरीट सोमय्या यांनी ठाकरेंना घेरण्याचे आदेश कुणी दिले होते आणि काय चर्चा झाली होती, याबद्दल भूमिका मांडली.

भाजपचे नेते किरीट सोमय्या मुंबई Tak चावडीवर आले होते. या मुलाखतीत त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर त्यांची भूमिका मांडली. याचवेळी त्यांना उद्धव ठाकरेंबद्दल प्रश्न विचारण्यात आला. देवेंद्र फडणवीस आणि दिल्लीतील नेत्यांचा उल्लेख करत त्यांनी सविस्तर उत्तर दिले.

'तुम्हाला हे कुणी सांगितलं होतं की, मातोश्रीवर अटॅक करा? तुम्हाला पक्षाकडून सांगण्यात आलं होतं का?', असा प्रश्न किरीट सोमय्या यांना विचारण्यात आला होता.

या प्रश्नाला उत्तर देताना किरीट सोमय्या म्हणाले की, "एक गोष्ट सगळे मान्य करतात की, किरीट सोमय्या हा पक्षाचा शिस्तबद्ध कार्यकर्ता आहे. यात आलं सगळं उत्तर. माझ्या पक्षाने मला ज्या-ज्या वेळी जे-जे सांगितलं, ते मी केलं."

"मातोश्रीचा भ्रष्टाचार काढायचा असो की, हसन मुश्रीफचा असो... संशोधन माझं, कमिटमेंट माझी, आक्रमकपणा माझा, पण पहिली राजकीय चर्चा आम्ही करतो. त्यात झालं माझा, पण पाहला राजकाय चचा जाम्हा करता. त्यात झाल की, गो अहेड (सुरू करा.) मग झालं", असं किरीट सोमय्या म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, "त्यावेळी माझी स्वतःचीच इच्छा होती की, मुंबई महापालिका... त्याचा जो भ्रष्टाचार आहे आणि म्हणून मुंबई महापालिकेला या मातोश्री आणि त्यांच्या माफिया कंत्राटदारांपासून मुक्त केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना ते आवडलं. दिल्लीला पटलं. आणि त्यांनी सांगितलं."

"मी त्यांना सांगितलं होतं की, ठाकरे नको, आपण त्याच्याशिवाय सगळे भ्रष्टाचार... देवेंद्रजींनी सांगितलं की, हा पक्षाचा आदेश आहे की, त्यांनी जो काही गोंधळ घातला असेल, जो महापालिकेशी संबंधित असेल, तर काढायला हवा. मुंबईसाठी माझी वचनबद्धता आणि पक्षाचा निर्णय", असे उत्तर किरीट सोमय्या यांनी दिले.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.