Breaking News

6/recent/ticker-posts

KP Banner

M4U News

पोलीस शिपायाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या

पोलीस शिपायाची स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या



पुणे : खरा पंचनामा

खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपायाने लोहियानगर पोलीस चौकीत बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली. भरत अस्मार असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे.

भरत अस्मार खडक पोलीस ठाण्यात नियुक्तीस होते. लोहियानगर पोलीस चौकीत ते गुरुवारी रात्रपाळीस होते. मध्यरात्री ते आराम करण्यासाठी पोलीस चौकीतील खोलीत गेले. पहाटेच्या सुमारास त्याने बंदुकीतून स्वतःवर चार गोळ्या झाडून आत्महत्या केली.

ते सकाळी उशीरापर्यंत घरी न आल्याने त्यांची पत्नी अकराच्या सुमारास चौकीत आली. तेव्हा कर्मचाऱ्यांनी रेस्ट रुम उघडून बघितली असता ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.

कर्मचाऱ्यास तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. अस्मार यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. या घटनेनंतर शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

अस्मार यांनी कौटुंबिक वादातून आत्महत्या केल्याची शक्यता आहे. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२

➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.