मतदान केंद्रावर गोळीबार; नागरिकांमध्ये मोठी घबराट
मोइरांग : खरा पंचनामा
लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया आज सुरु झाली आहे. पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये व २ केंद्रशासित प्रदेशांमधील १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान सुरु आहे. लोकांमध्ये मतदानासाठी नवा उत्साह पाहायला मिळत आहे. मात्र त्याच दरम्यान, यंदाच्या निवडणुकीला गालबोट लागणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. मणिपूरमध्ये मतदान केंद्रावरच गोळीबार झाला आहे. या गोळीबारात ३ जण जखमी झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, मणिपूरच्या मोइरांग भागातील थमनपोकपी येथील एका मतदान केंद्राजवळ काही अज्ञात लोकांनी गोळीबार केला. या गोळीबारात ३ जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे रांगेत उभे असलेल्या मतदारांमध्ये घबराट पसरली. यासंदर्भातील एक विडिओ सुद्धा व्हायरल झाला आहे. या विडिओ मध्य तुम्ही बघू शकता कि, बंदुकीचा आवाज आणि नागरिकांचा गोंधळ पाहायला मिळतोय. मशीनगन किंवा ऑटोमॅटिक गनमधून गोळ्या झाडल्या जात असल्याचं व्हिडिओमधून दिसत आहे.
मणिपूर शिवाय छत्तीसगडमधील बस्तर लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान बिजापूरच्या चिहका येथे आयईडी स्फोट झाला. या स्फोटात सीआरपीएफचे असिस्टंट कमांडंट मनू एचसी यांच्या डाव्या पायाला आणि डाव्या हाताला दुखापत झाली. सीआरपीएफचे जवान चिहका मतदान केंद्राभोवती फिरत होते. यापूर्वी विजापूरमध्ये मतदान केंद्रापासून ५०० मीटर अंतरावर ग्रेनेडचा स्फोट झाला होता. ज्यात एक जवान जखमी झाला. पश्चिम बंगालच्या कूचबिहारमध्येही हिंसाचार झाला आणि येथे ईव्हीएम फोडण्यात आले. मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात घडलेल्या या सर्व घटनांनी लोकसभा निवडणुकीला गालबोट लागलं आहे.
कार्यकारी संपादक - श्री. अभिजीत बसुगडे -- जाहिरात व बातम्यांसाठी : +९१ ९८८१४ ००९०२
➤ वाढवा आपला व्यवसाय / वेब पोर्टल्स करिता इथे क्लिक करा.Call :- 9890 546 909.